भरदिवसा लुटमारीचा प्रयत्न

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : मुकुंदवाडीतील तथागत चौक परिसरात भरदिवसा एका नशेखोर गुंडाने तरुणाला अडवून त्याचा मोबाइल, रोख रक्कम हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रसंगावधान राखत दोन तरुणांनी त्याची सुटका केली. तर संतप्त नागरिकांनी गुन्हेगाराला चोप दिला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, शहरातील कायदा सुव्यवस्थेवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला.
तथागत चौक परिसरात मद्यधुंद अवस्थेतील व्यक्तीने
बाहेरगावच्या एका तरुणाला अडवून दमदाटी सुरू केली. त्याच्याकडील मोबाईल आणि पैसे हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्याला रस्त्यावर ढकलून देत मारहाण केली. हा प्रकार योगेश सोनवणे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी तत्काळ तावडीतून लुटारूच्या तरुणाची सुटका केली. त्यानंतर लुटारूला चोपही दिला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली नव्हती. घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शहरातील वाढत्या गुन्हेगारी, लूटमारीवर संताप व्यक्त केला जात आहे.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions